मंदीराची स्थापना १३०० -१४०० या काळात झाली आहे. कान्हो नर्सी नावाचा प्रधान हा शाही दरबारात होता. तो खुप ईमानदार होता. परंतु दरबारातील काही मंड्ळींनी त्यांच्या विरुध्द बादशहा चे कान भरले. यामूळे बादशहाने त्यांना प्रधान या पदावरुन निलंबित केले. त्यावेळेस त्यांनी भातोडी येथे अनुष्ठान केले व नवस बोलला. ठीक ४ दिवसांनी त्यांच्यावरील आरोप टळला व बादशहाने त्यांना दरबारात बोलावुन घेतले व त्यांना त्यांचे पद परत देण्यात आले. त्यांनी बोललेल्या नवसाप्रमाणे मंदीराची उभारणी केली. मंदीराला भक्क्म तटबंदी करुन त्यावर मंदीर बांधले आहे. मंदीराच्या समोर मेहकरी नदी आहे या नदिचा उगम आगडगाव-रतडगावच्या डोंगरावरुन झाला आहे.
याच मंदीराचे प्रतीरुप पाकिस्थानात कराचीमधील नरसिमपाल या भागात आहे. या मंदीरावर आनंद जोशी यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
या मंदीरामध्ये पांडुरंग खंडु राऊत हे व्रुध्द बासरीवाद्क खुप सुंदर बासरी वाजवतात.