Friday, 25 April 2014

मोहटादेवी

श्री क्षेत्र मोहटादेवी, पाथर्डी
श्री क्षेत्र मोहटादेवी, पाथर्डी पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री क्षेत्र मोहटादेवी येथील देवता श्री कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।। वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिची महती.

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी, (श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता. श्री नवनाथाना तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली. तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाला.

धार्मिक उत्सव
मासीक उत्सव - दर पौर्णिमेस महाभिषेक पुजा, रात्री, 8 ते 9 अन्नदान 9 ते 11 किर्तन, 11 ते पहाटे 4 हरीजागर.

वार्षिक उत्सव – चैत्र शु. प्रतिपदा ते रामनवमी – वा नवरात्रोत्सव श्रीराम जन्मोत्सव. श्रावण वद्य 8 श्री कृष्ण जन्मोत्सव भाद्रपद 4 ते 40 श्री गणेशोत्सव आश्विन शु. 1 ते 9 शारदीय नवरात्रोत्सव आश्विन शु. 11 प्रगट दिन आनंदोत्सव कार्तिक शु. 1 मोहटागावामध्ये चांदीच्या मुखवटा पुजन दर्शन सोहळा. 7) मार्गशिर्ष शु. 15 दत्तजन्मोत्सव 8) पौष शु. 7 ते 15 शाकंभरी नवरात्रोत्सव 9) माघ वद्य 30 महाशिवरात्र 10) फाल्गुन शु. 15 होळी पुजन 11) चैत्र शु. 15 श्री हनुमान जन्मोत्सव

शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.

आश्विन शु. 9 होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती

आश्विन शु. प्रतिपदा ते महानवमी पर्यंत नित्य अखंड हरीनाम सप्ताह, काकडआरती भजन रात्रौ 9 ते 11 हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी. विजयादशमी – श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी) सिमोलंघन शमीपुजजन

एकादशी – प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ 8 ते प. 3 आश्विन 12 नामांकित मल्लांचा चंगी हंगामा. बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा