Friday, 25 April 2014

श्री क्षेत्र वृध्देश्वर



















श्री क्षेत्र वृध्देश्वर मंदीर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर या गावी आहे . नगरहुन सुमारे ४० ते ४५ कि.मी. अंतरावर आहे. येथे जागृत शिव मंदीर आहे.
येथील शिवलींग स्वयंभु शिवलींग आहे, ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकाराएवढे वाढते म्हणजेच वृध्दींगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते . “आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य.” वृध्देश्वर हे नाथ सांप्रदायाचे आद्यपिठ म्हणुन ओळख आहे. आणि तसेच नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक २३ मध्ये याच ठिकाणी शंकर भगवान व पार्वती म्हातारयाचे रुप घेऊन पंगतीला वाढण्याचे काम केले म्हणुन त्यांना “म्हातारदेव” नावाने देखील ओळखले जाते व शंकर भगवान यांनी मी येथेच स्वयंभु परिपुर्ण राहील असे सांगीतले.
या शिवलिंगामधुन कायम गंगा वहाते.. येथे नाथांनी यज्ञ केलेला आहे. या यज्ञासाठी ३३ कोटी देव आले होते आणि हाच गर्भगिरी डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा डोंगर केलेला आहे.
स्त्री राज्यातुन मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथांनी आणले, त्यावेळेस मैनावती राणीने दिलेली सोन्याची वीट असलेली झोळी मच्छिंद्रनाथाने लघवीचे निमित्त करुन गोरक्षनाथाकडे दिली त्यात ती सोन्याची वीट होती. गोरक्षनाथाने ती विट फेकुन दिली व त्यामध्ये त्याच आकाराचा दगड ठेवला. गर्भागिरीच्या डोंगरावर आल्यावर मच्छिंद्रनाथांनी झोळी मध्ये पाहिले तर दगड होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरु झाले व गोरक्षनाथांनी गर्भागिरी डोंगर सोन्याच्या करुन दाखवला.
येथे महाशिवरात्र, श्रावणी तिसरा सोमवार या दिवशी पैठण वरुन पायी कावडीने पाणी आणले जाते. या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असुन लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
वृध्देश्वर या ठिकाणी आर्युवेदीक वनस्पती भरपुर प्रमाणात आढळतात येथे वनाविभागाने पर्यटन केंद्रही चालु केले आहे. मंदिरासभोवती मोर, वानर इ. प्राणि खुल्या वातावरणात पहावयास मिळतात. त्याचा भाविक आनंद लुटतात. श्रावण मासा निमित्ताने महिनाभर बेलआरती सायंकाळी ८ ते ९ या वेळेत होते. बेल आरतीची सांगता व देवाला शित लावणे हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणी महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेतात. येथे धार्मिक साप्ताहिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. हा परिसर फुलवेलींनी नटलेला आहे.
देवस्थान समितीने सुंदर कोरीवकाम असलेले राजस्थानी पध्द्तीचे प्रवेशव्दाराचे व ओवऱ्याचे काम हाती घेतले आहे. श्री वृध्देश्वर देवस्थान घाटशिरस ट्रस्ट अध्यक्ष सुधाकर शिवराम पालवे यांच्या अध्यक्षतेखाली  मंदिराचे व्यवस्थापन व इतर कामे सुनियोजित गतीने चालु आहेत.