वीरभद्र देवस्थान हे ६०० वर्षापुर्वीचे मंदीर आहे. या मंदीराचे बांधकाम हे चांदबीबी महालाच्या कामा बरोबर झाले आहे.
चांदबीबी महालाचे शिल्पकार लिंगायत व जंगम यांची विरभद्र देवावर खुप श्रध्दा होती. हे लोक सकाळी देवाचे दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुध्दा घेत नसत. त्यामुळे ते महिन्यातुन १-२ वेळेस कर्नाट्कास दर्शनासाठी जात असत. त्यामध्ये त्याचां खुप वेळ जात असत. देव गावच्या पाट्लाच्या स्वप्नात आले व सांगितले की मी दिवटे डोंगरावर प्रकट झालो आहे. मुर्ती गावात आणुन गावातील लोकांनी तिची स्थापना केली. लिंगायत व जंगम लोकांनी मंदीराचे बांधकाम केले. सर्व जंगम समाजाचे हे कुलदैवत आहे. मुर्ती ५॥ फ़ुट उंच आहे.
मंदिरामध्ये वर्षातुन चार उत्सव होतात,
१.मानुरकर महाराज यांची पण्यतिथी सोहळा(आषाढ-शुध्द षष्टी)या दिवशी असतो.
२.इराणी यात्रा-बैलपोळ्याच्या दुसरयादिवशी ही यात्रा असते.
३.कार्तिक पोर्णिमेच्या दुसरयादिवशी जंगम लोकांची यात्रा असते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील जंगम समाजाची सर्व लोक येतात.
४.मार्गशीष शुध्द प्रतिपदेला देवजन्म(उप्परगुढी)साजरी होते.
मंदीराची व देवाची पुजा व सेवा करण्यासाठी ९ पुजारी आहेत.
विरभद्र मंदीर देवस्थान ट्र्स्ट येथे कार्यरत आहे.