पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी
हे आतिशय भव्य व प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीरचे संपुर्ण काम काचेमध्ये केलेले आहे . येथील मंदीराच्या बाजुला विहीर आहे ,या विहीरीमधुन नवरात्रामध्ये सोन्याची घागर वर येते असे ,असे स्थानिक लोकांचे म्हणने आहे.
आख्यायिका :
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावतील जठार घराण्यात एक व्यक्ती राह्त होती. तो माहुरगडाच्या जगदंबेची अतिशय मनापासुन भक्ती करत होता. त्याचे लग्न होऊन बरेच दिवस झाले ,परंतु त्याला मुलबाळ होईना म्हणुन त्याने माहुरगडच्या जगदंबेला मुलबाळ होऊ दे, असे साकडे घातले व तो जगदंबेची मनापासुन भक्ती लागला .त्याला एके दिवशी रात्री स्वप्न पड्ले की ,स्वप्नात देवीने सांगितल्याप्रमाणे तो भल्या पहाटे उठुन शेताता स्व्प्नात सांगितलेल्या ठिकाणी गेला. तेवढ्यात एका छोट्याशा बालकाचे रड्णे ऎकु आले .नंतर तो आवाजाच्या दिशेने जावु लागला .जवळ गेल्यानंतर त्याला फ़ुललेल्या तरवडाच्या झाडाखाली एक सुंदरशी मुलगी द्रुष्टीस पड्ली .त्याने ते छोटेसे बालक अलगत उचलुन आपल्या घरी आणले . तिला पाहताच त्याच्या पत्नीला व घरातील सर्वांना आनंद झाला ते दोघेही त्या मुलीचा सांभाळ ,पालणपोषण करु लागले. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. जगदंबेच्या क्रुपेमुळे तिला घरातील सर्व मंड्ळी अंबिका असे म्हणत. अंबिका आता उपवर झाली .तिचे लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटु लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछ्त्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकेचा विवाह ठरला. योग्य वेळेत तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावु येऊ लागली. दरंदलेंचा शेतीचा व्यवसाय फ़ार मोठया प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकरयांना इरजीकाचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकेला न्याहरीसाठी स्वंपाक करावयास सांगितले. इरजिकीचा दिवस उगवला .अंबिकाने स्वंपाक करण्यास सुरवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले. सासरे भाकरी घेण्यासाठी शेतावरुन घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरुन ठेवले होते. सासरयाने टोपले उचलुन शेतावर नेले. न्याहरीची वेळ झाली होती .शेतक्ररयांना त्यांनी न्याहरीसाठी हाक मारली. भाकरी कालवणाचे टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन सासरयांना विचार पडला. हे जेवण सर्वांना कसे पुरणार ? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की थॊडी थॊडी भाकरी खाऊया तर सासरयांनी जेवण वाढण्यास सुरवात केली. जेवढ्या भाकरी उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसु लागल्या .कालवणही तेवढेच दिसु लागले. सर्वांची जेवणे पोटभर जेवणे झाली तरी टोपल्यात पाच भाकरी व शेडगाभर कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्यचकित झाले .ही बातमी शेतकरयांमार्फ़त हा हा म्हणता संपुर्ण रुई गावात पसरली . अंबिकेच्या सासुला ही बातमी कळली ती अतिशय नाराज झाली .तिला वाटले की कोणीतरी काट्कीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही,असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच दुसरयादिवशी अंबिकेला माहेरी पाठवण्याची. सुनबाईना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरयांची नेमणुक झाली. त्याकाळी कुठल्याही प्रकारची वाहने नव्हती. सासरयाच्या घरी एक सुंदरशी घोडी होती .ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरु झाला. विसापुरच्या अलिकडे नगर तालुक्यातील घोसपुरी नावाचे गाव आहे. तेथपर्यंत येण्यास दुपार झालीहोती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावातील एका विहीरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. त्या विहीरीवर पाणी काढण्यासाठी काहीच साधन नव्हते. त्या विहीरीच्या मालकास विचारले असता त्यानेही काही साधन नसल्याचे सांगितले,म्हणुन त्यांनी थोडे पुधे जावुन नदीच्या कडेला झरा पाहिला व त्या ठिकाणी अंबिका पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेतले व सासरयांना दिले व अंबिका देखील पाणी प्याली. झरयाजवळील निसर्गरम्य परिसर पाहुन अंबिकेचे मन रमले व अंबिका काहीतरी निमित्त करुन सासरयापासुन दुर अंतरवर गेली .अंगावरील सर्व दाग-दागिने झरयाजवळील एका दगडाखाली ठेवुन ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला अंबिका काही येईना.सासरा विचारात पडला. त्याने अंबिका म्हणुन मोठ-मोठ्याने हाक मारण्यास सुरवात केली . तर गावापासुन २ कि.मी अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावरुन जी असा आवाज एकु येवु लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसुन टेंभीच्या डोंगरावर धावत गेला. तेथे जावुन पाहतो तर अंबिका कोठेच दिसेना, टेंभीच्या डोंगरावरुन अंबिका अशी हाक मारली देवीने त्यांना गुप्त झालेल्या ठिकाणावरुन आवाज दिला .सासरे पुन्हा घोड्यावर बसुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. त्या घोड्याबरोबर त्या घोड्याचे शिंगरु होते. तेथे येवुन आपल्या सुनेस शोधले परंतु देवी दिसली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा देवीला हाक मारली. त्यावेळी देवीने टेंभीवरुन आवाज दिला पुन्हा पुन्हा असे घडत राहिल्याने घोडी व शिंगरु टेकडी चढता चढता थकुन गेले .घोडी व शिंगरु ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी त्यांचे पावले पाषाणात उमटले. त्या पाऊलखुणा आजही जशाच्या तशा दिसतात.
सासरे घोडी व शिंगरु घेवुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. अंबिकेचा शोध घेता-घेता सासरे फ़ार थकले व विचार करु लागले की ,घरच्या व माहेरच्या लोकांना काय सांगावे? या प्रश्नाचा विचार करता करता त्यांनी जीव सोड्ला .हे पाहुन घोडी व शिंगरु त्या देहाच्या कडेने फ़िरु लागले व किंचाळु लागले.मालकाची कुठल्याही प्रकारची हालचाल न दिसल्यामुळे त्या बिचारया मुक्या प्राण्यांनीही आपला देह सोडला. पद्मावती सासुच्या स्वप्नात गेली व गुप्त झालेल्या ठिकाणाची माहिती द्रुष्टांत रुपात सांगितली. झरयाजवळील एका दगडाखाली दाग-दागिणे ठेवले आहेत त्याच ठिकाणी सासरे,घोडी व शिंगरु यांचा त्याच ठिकाणी देहत्याग झालेला आहे. दरंद्ले कुटुंबातील व्यक्तींनी त्या ठिकाणी येवुन शहनिशा केली. त्यावेळी घोसपुरी गावातील लोकांनी त्या ठिकाणी सासरयांची व घोड्याची समाधी बांधली व ज्या दगडाखाली दाग-दागिने ठेवले होते ते पाहण्यास गेले.त्या ठिकाणी दाग-दागिने व तांदळा(देवीचा) सापडला .ते दाग-दागिने त्यावेळी दरंदले कुटुंबीयांच्या स्वाधीन झाले. तांदळा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आले व मंदिरा तांदळाची विधी विधीनपुर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजही तो तांद्ळादर्शनासाठी खुला केला जातो.