Wednesday 9 July 2014

मळगंगा देवी मंदिर, निघोज, पारनेर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुखी, समृद्ध असणारे गाव निघोज . अहमदनगर जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर कुकडी नदी ( पुष्पा ) च्या काठावर आहे . तसेच शिरूर ( जि.पुणे ) येथून २४ कि.मी. अंतरावर आहे. निघोज हे गाव सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. गावाचे ग्रामदैवत असलेले जागृत देवस्थान श्री मळगंगा देवीचे मोठे मंदिर आहे.
मळगंगा मंदिराच्या जिर्नोध्दाराचे काम लोक वर्गणीद्वारे पूर्ण झाले आहे. गाभर्‍याचे बांधकाम १५ फूट रूंद आहे. सभामंडप ३२ फूट रूंद आहे. मंदिराच्या कळसची ऊंची जमिनीपासून ८५ फूट आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडामध्ये केलेले आहे.
निघोज गावातील देवीच्या मंदिराच्या पाठीमागे १०० फूट अंतरावर बारव ( विहीर ) आहे. याच बारवेमधून मळगंगा देवी घागर रूपाने दर्शन देते. या बारवेचे बांधकाम पेशवाई काळात झाले आहे.

members

pashu_hatya_bandi

श्री क्षेत्र देवगड़ संस्थान

                ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती देणारे देवगड़ हे एक प्रसन्न तीर्थक्षेत्र आहे. तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर(महाराष्ट्र) येथे या ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती तुम्हाला नक्कीच मिळेल.


             संत परंपरेला समृद्ध करणारे अलीकडच्या काळातील महान संत समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा.देवगडजवळच्या गोधेगावात १९०७ साली सत्शील माता-पित्यांच्या पोटी जन्म घेउन त्यांनी स्वत:सहसमाजाच्या कल्याण्याचा ध्यास घेतला. प्रवरेच्या पात्रात सतत १२ वर्ष श्री शंकराची आराधना करणा-याबाबांनी समाजाला साधानेतिल सातत्याचा सल्ला दिला. अत्यंत साधी रहाणी आणि सात्विक भोजनाचाआग्रह धरून देहवाद सोडला पाहिजे हे शिकविले. पूजनीय किसनगिरी बाबांनी सामान्यांना श्रधेसहजगण्याची शिकवण दिली. आपल्या वैराग्यसंपन्न वर्तनातून जगण्याचा मापदंड घालून दिला.देवगडलाश्रीद्त्तप्रभूंच्या मंदिराची उभारणी करुन संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. ज्या प्रवरेतीरी नेवासा येथे श्रीज्ञानदेवांनी गीतेचा उपदेश सोपा करुन सांगितला तोच उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणून त्याच प्रवरेच्याकाठी देवगड़ येथे समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला. अखंडनामस्मरण, सर्वकल्याणाचा ध्यास आणि लोकहिताचा उपदेश हेच त्यांचे जीवन होते. 

            आपली जीवनयात्रा १९८३ मध्ये संपवताना समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी इश्वरनिष्ठांची मंडियाळीउभी केली होती. विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेल्या सतशिष्यांचा मेळा जमवला होता. तळागाळातीलसामान्यालाही अध्यात्म सोपे आहे, असे समजावून मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतले होते. 

                   सत्पुरुषांचे लौकिक जीवन देह्त्यागाने संपले, तरीही समाधिरुपाने त्यांचे अलौकिक जीवन निरंतर,अक्षय असते. सत्पुरुषांच्या समाधिस्थळी भाविकांना श्रधेच्या बळाने त्यांचे वास्तव्य अनुभवता येते. हाअनुभव देणारे समर्थ किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर.

संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासा

            श्री क्षेत्र नेवासा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेच्या तटावर अनादी काळापासून वसलेले व अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपणारे, सांगणारे एक उत्तम क्षेत्र आहे. परम पावन प्रवरेच्या काठावर बसलेले नेवाशा शहर महणजे वारकरी उर्फ भागवत धर्माचे आध्यात्मिक पीठच होय. नेवासा तीर्थक्षेत्राची ओळख नाही अशी मराठी व्यक्ती महाराष्ट्रभर शोधूनही सापडणार नाही.

                  विश्ववंदनीय ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि पवित्र भूमी आहे. याच भूमीत माऊलीनी मराठी भाषिकांना गुह्य असा ज्ञानाचा सागर खुला करून दिला व तमाम जगातला ललामभूत ठरणारा ग्रंथ याच भूमीमध्ये १२ व्या शतकात निर्माण केला. ह्याच पवित्र भूमी वर पूर्वी करवीरश्वराचे मंदिर होते आणि त्याच मंदिरातील पवित्र खांबाला (पैस) टेकून श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, आमुतानुभव, हरिपाठ इ. मौलिक ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी केली. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले, परंतु जगाला दिव्य संदेश देणारा पवित्र खांब (पैस) मात्र आजहि अबाधित राहिला. खांबाभोवती मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण. तोच पवित्र खांब एका भव्य दिव्य पुरुषाची जवळ - जवळ ६५० ते ७०० वर्ष वाट पहात उभा होता ती व्यक्ती महणजे वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांची, त्याच्याच जीवन प्रेरणेतून व पवित्र हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार लाखो भाविकांच्या सहकार्यातून झाला आहे.

                     आज हि देवस्थान स्मरणीय व विलोभनीय वाटते. ज्ञानेश्वर मंदिराच्या ईशान्य भागात आणि वायव्य भागात जर एकट्याने फिरून पहिले तर असंख्य प्रमाणात मोरांचे व पोपटांचे ठावे आजही दृष्टीस पडतात. या ठिकाणी विहार केला तर मनास एक अनामिक गोड शक्तीचा शोध घेण्याची नकळत ओढ निर्माण होते. दर वद्य एकादशीला २० ते २५ लोक एकत्र येऊन या मंदिरात भजन करीत असतात. नेवासा हे क्षेत्र पुरण प्रसिद्ध तर आहेच शिवाय महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाचे आदिपीठ आहे. कारण वारकरी सांप्रद्रायातील जी प्रस्थान त्रयी आहे. त्यातील ज्ञानेश्वरी हा एक श्रेष्ठ ग्रंथ होय. याच कारविरेश्वरांच्या मंदिरात, याच खांबाला टेकून दुसरा अमृताचा अनुभव सांगणारा व श्रोत्यांना पाजणारा ग्रंथ अमृतानुभव निर्माण झाला या ग्रंथांना आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे.

श्री रेणुका माता मंदिर, सोनई

       नेवासा तालुक्यातील आणखी एक पाहण्याजोगे ठिकाण म्हणजे श्री रेणुका माता मंदिर सोनई. 
सोनई नजीक बेल्हेकरवाडी येथे हे काच मंदिर आहे. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पासून ७ की. मी. अंतरावर रेणुकादेवी मंदिर आहे. सन १९५४ मध्ये श्री अण्णा स्वामी महाराजांना संचार होऊन जगदंबा भगवतीने संदेश दिला कि - तुमच्या सोनई च्या वडिलोपार्जित भूमीत मी प्रकट होईन तेथे मंदिर स्थापून माझी प्राणप्रतिष्ठा करा व भक्तीने सेवा उपासना करा. उज्ज्वल भविष्यकाळ निकट येत आहे.

                    श्री क्षेत्र रेणुकामाता दरबार परिसरात अन्य काही देवतांची स्थापना केलीली दिसून येते विशेषतः जलदेवता, नागदेवता, काळभैरव, सप्तयोगिनी, श्री दत्तात्रय, औदुंबर, छाया , वेताळ , चतुराई ईत्यादि . मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावर सन १९९१ मध्ये श्री दुर्गामातेची ८ फुटाची प्रसन्न मूर्तीची स्थापना केलीली आ���े. मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात. त्या पैकी वासंतिक नवरात्र, गुरुपोर्णिमा , शारदीय नवरात्र या उत्सवांना भाविकांची अलोट गर्दी असते.

                    प्रातःकाल ते मध्यरात्रीपर्यंत आश्रमात नित्य भजन , पूजन , आरती , नामस्मरण आदि उपासना चालू असते, हया व्यतिरिक्त अनेक पारायणे, शतीचंडी,पंचकुंडी याग, नवग्रह याग, दशकुंडी याग, विष्णूयाग, भागवत सप्ताह , गीत याग , शिवयाग , गायत्री याग, गणेशचंडी याग, नवार्णी , यजुर्वेद संहिता,स्वाह्कर, पंचायतन याग, महारुद्र स्वाहाकारा १३५ कुडात्मक लाक्षचंडी याग , अतिरुद्र स्वाहाकार, स्वर्गारोहण शैत्यथान, सहस्त्रचंडी, श्री दत्त याग ई. पवित्र विधी वेळोवेळी सम्पन्न होतात. संस्कृत विर्याजनासाठी वेदशाळा उभारली असून त्यात अनेक बुध्दिमान विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. इथे संगीत कला व ताल वाद्याचे शिक्षण दिले जाते.

श्री दत्तधाम मंदिर, चांदा

         अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे . अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर मोहता देवी , देवगड नेवासा ई. हि सर्व ठिकाणे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी .



            अशाच या नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकापासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे - औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी - शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्यामार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे .. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. . अनेक थोर संत महापुरुषांचे वास्त्यव्य या गावात झाले आहे .जुन्या काळी जेव्हा मोघालांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराज सुद्धा या गावात आले होते . आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे . आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय .


                   श्री दत्त साधकाश्रामाची सुरुवात प पु गु ह भ प श्री संत रोहीदासजी महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्याकठोर तपश्चर्येचे प्रतिक म्हणून हा आश्रम उभारला आहे. प पु गु सद्गुरू रोहीदासजी महाराज हे मुलाचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सूर होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेद होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे ठरवले. व या ठिकाणाला अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन श्री दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने आवळून आणलेली श्री दत्त मूर्��ीची स्थापना केली. याच श्री दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसन ग्रस्तांना व्यसन मुक्त केले. व अनेकांना भगवंताचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर मध्ये अध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही. 

               सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.

       दत्त साधकाश्रामच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो .
त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे.
येथील वर्षातील महत्वाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे...
१. गुरुपोर्णिमा - आषाढ शुध्द पोर्णिमा
२. तुकारामबीज सप्ताह - फाल्गुन बीज - ध्यान शिबीर ७ दिवस
३. दत्त जयंती सोहळा - डिसेंबर

अमृतेश्वर मंदिर

हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुना असलेले पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. 

अमृतेश्वर मंदिर


मंदिराची रचना 
मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला असणारा एक अर्धमंडप, मंडप, अंतराळ, व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे.  मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर अलंकृत चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आणि वर कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.