अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुखी, समृद्ध असणारे गाव निघोज . अहमदनगर जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर कुकडी नदी ( पुष्पा ) च्या काठावर आहे . तसेच शिरूर ( जि.पुणे ) येथून २४ कि.मी. अंतरावर आहे. निघोज हे गाव सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. गावाचे ग्रामदैवत असलेले जागृत देवस्थान श्री मळगंगा देवीचे मोठे मंदिर आहे.
मळगंगा मंदिराच्या जिर्नोध्दाराचे काम लोक वर्गणीद्वारे पूर्ण झाले आहे. गाभर्याचे बांधकाम १५ फूट रूंद आहे. सभामंडप ३२ फूट रूंद आहे. मंदिराच्या कळसची ऊंची जमिनीपासून ८५ फूट आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडामध्ये केलेले आहे.
निघोज गावातील देवीच्या मंदिराच्या पाठीमागे १०० फूट अंतरावर बारव ( विहीर ) आहे. याच बारवेमधून मळगंगा देवी घागर रूपाने दर्शन देते. या बारवेचे बांधकाम पेशवाई काळात झाले आहे.