Wednesday 9 July 2014

मळगंगा देवी मंदिर, निघोज, पारनेर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुखी, समृद्ध असणारे गाव निघोज . अहमदनगर जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर कुकडी नदी ( पुष्पा ) च्या काठावर आहे . तसेच शिरूर ( जि.पुणे ) येथून २४ कि.मी. अंतरावर आहे. निघोज हे गाव सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. गावाचे ग्रामदैवत असलेले जागृत देवस्थान श्री मळगंगा देवीचे मोठे मंदिर आहे.
मळगंगा मंदिराच्या जिर्नोध्दाराचे काम लोक वर्गणीद्वारे पूर्ण झाले आहे. गाभर्‍याचे बांधकाम १५ फूट रूंद आहे. सभामंडप ३२ फूट रूंद आहे. मंदिराच्या कळसची ऊंची जमिनीपासून ८५ फूट आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडामध्ये केलेले आहे.
निघोज गावातील देवीच्या मंदिराच्या पाठीमागे १०० फूट अंतरावर बारव ( विहीर ) आहे. याच बारवेमधून मळगंगा देवी घागर रूपाने दर्शन देते. या बारवेचे बांधकाम पेशवाई काळात झाले आहे.

members

pashu_hatya_bandi

श्री क्षेत्र देवगड़ संस्थान

                ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती देणारे देवगड़ हे एक प्रसन्न तीर्थक्षेत्र आहे. तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर(महाराष्ट्र) येथे या ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती तुम्हाला नक्कीच मिळेल.


             संत परंपरेला समृद्ध करणारे अलीकडच्या काळातील महान संत समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा.देवगडजवळच्या गोधेगावात १९०७ साली सत्शील माता-पित्यांच्या पोटी जन्म घेउन त्यांनी स्वत:सहसमाजाच्या कल्याण्याचा ध्यास घेतला. प्रवरेच्या पात्रात सतत १२ वर्ष श्री शंकराची आराधना करणा-याबाबांनी समाजाला साधानेतिल सातत्याचा सल्ला दिला. अत्यंत साधी रहाणी आणि सात्विक भोजनाचाआग्रह धरून देहवाद सोडला पाहिजे हे शिकविले. पूजनीय किसनगिरी बाबांनी सामान्यांना श्रधेसहजगण्याची शिकवण दिली. आपल्या वैराग्यसंपन्न वर्तनातून जगण्याचा मापदंड घालून दिला.देवगडलाश्रीद्त्तप्रभूंच्या मंदिराची उभारणी करुन संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. ज्या प्रवरेतीरी नेवासा येथे श्रीज्ञानदेवांनी गीतेचा उपदेश सोपा करुन सांगितला तोच उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणून त्याच प्रवरेच्याकाठी देवगड़ येथे समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला. अखंडनामस्मरण, सर्वकल्याणाचा ध्यास आणि लोकहिताचा उपदेश हेच त्यांचे जीवन होते. 

            आपली जीवनयात्रा १९८३ मध्ये संपवताना समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी इश्वरनिष्ठांची मंडियाळीउभी केली होती. विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेल्या सतशिष्यांचा मेळा जमवला होता. तळागाळातीलसामान्यालाही अध्यात्म सोपे आहे, असे समजावून मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतले होते. 

                   सत्पुरुषांचे लौकिक जीवन देह्त्यागाने संपले, तरीही समाधिरुपाने त्यांचे अलौकिक जीवन निरंतर,अक्षय असते. सत्पुरुषांच्या समाधिस्थळी भाविकांना श्रधेच्या बळाने त्यांचे वास्तव्य अनुभवता येते. हाअनुभव देणारे समर्थ किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर.

संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासा

            श्री क्षेत्र नेवासा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेच्या तटावर अनादी काळापासून वसलेले व अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपणारे, सांगणारे एक उत्तम क्षेत्र आहे. परम पावन प्रवरेच्या काठावर बसलेले नेवाशा शहर महणजे वारकरी उर्फ भागवत धर्माचे आध्यात्मिक पीठच होय. नेवासा तीर्थक्षेत्राची ओळख नाही अशी मराठी व्यक्ती महाराष्ट्रभर शोधूनही सापडणार नाही.

                  विश्ववंदनीय ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि पवित्र भूमी आहे. याच भूमीत माऊलीनी मराठी भाषिकांना गुह्य असा ज्ञानाचा सागर खुला करून दिला व तमाम जगातला ललामभूत ठरणारा ग्रंथ याच भूमीमध्ये १२ व्या शतकात निर्माण केला. ह्याच पवित्र भूमी वर पूर्वी करवीरश्वराचे मंदिर होते आणि त्याच मंदिरातील पवित्र खांबाला (पैस) टेकून श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, आमुतानुभव, हरिपाठ इ. मौलिक ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी केली. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले, परंतु जगाला दिव्य संदेश देणारा पवित्र खांब (पैस) मात्र आजहि अबाधित राहिला. खांबाभोवती मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण. तोच पवित्र खांब एका भव्य दिव्य पुरुषाची जवळ - जवळ ६५० ते ७०० वर्ष वाट पहात उभा होता ती व्यक्ती महणजे वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांची, त्याच्याच जीवन प्रेरणेतून व पवित्र हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार लाखो भाविकांच्या सहकार्यातून झाला आहे.

                     आज हि देवस्थान स्मरणीय व विलोभनीय वाटते. ज्ञानेश्वर मंदिराच्या ईशान्य भागात आणि वायव्य भागात जर एकट्याने फिरून पहिले तर असंख्य प्रमाणात मोरांचे व पोपटांचे ठावे आजही दृष्टीस पडतात. या ठिकाणी विहार केला तर मनास एक अनामिक गोड शक्तीचा शोध घेण्याची नकळत ओढ निर्माण होते. दर वद्य एकादशीला २० ते २५ लोक एकत्र येऊन या मंदिरात भजन करीत असतात. नेवासा हे क्षेत्र पुरण प्रसिद्ध तर आहेच शिवाय महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाचे आदिपीठ आहे. कारण वारकरी सांप्रद्रायातील जी प्रस्थान त्रयी आहे. त्यातील ज्ञानेश्वरी हा एक श्रेष्ठ ग्रंथ होय. याच कारविरेश्वरांच्या मंदिरात, याच खांबाला टेकून दुसरा अमृताचा अनुभव सांगणारा व श्रोत्यांना पाजणारा ग्रंथ अमृतानुभव निर्माण झाला या ग्रंथांना आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे.

श्री रेणुका माता मंदिर, सोनई

       नेवासा तालुक्यातील आणखी एक पाहण्याजोगे ठिकाण म्हणजे श्री रेणुका माता मंदिर सोनई. 
सोनई नजीक बेल्हेकरवाडी येथे हे काच मंदिर आहे. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पासून ७ की. मी. अंतरावर रेणुकादेवी मंदिर आहे. सन १९५४ मध्ये श्री अण्णा स्वामी महाराजांना संचार होऊन जगदंबा भगवतीने संदेश दिला कि - तुमच्या सोनई च्या वडिलोपार्जित भूमीत मी प्रकट होईन तेथे मंदिर स्थापून माझी प्राणप्रतिष्ठा करा व भक्तीने सेवा उपासना करा. उज्ज्वल भविष्यकाळ निकट येत आहे.

                    श्री क्षेत्र रेणुकामाता दरबार परिसरात अन्य काही देवतांची स्थापना केलीली दिसून येते विशेषतः जलदेवता, नागदेवता, काळभैरव, सप्तयोगिनी, श्री दत्तात्रय, औदुंबर, छाया , वेताळ , चतुराई ईत्यादि . मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावर सन १९९१ मध्ये श्री दुर्गामातेची ८ फुटाची प्रसन्न मूर्तीची स्थापना केलीली आ���े. मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात. त्या पैकी वासंतिक नवरात्र, गुरुपोर्णिमा , शारदीय नवरात्र या उत्सवांना भाविकांची अलोट गर्दी असते.

                    प्रातःकाल ते मध्यरात्रीपर्यंत आश्रमात नित्य भजन , पूजन , आरती , नामस्मरण आदि उपासना चालू असते, हया व्यतिरिक्त अनेक पारायणे, शतीचंडी,पंचकुंडी याग, नवग्रह याग, दशकुंडी याग, विष्णूयाग, भागवत सप्ताह , गीत याग , शिवयाग , गायत्री याग, गणेशचंडी याग, नवार्णी , यजुर्वेद संहिता,स्वाह्कर, पंचायतन याग, महारुद्र स्वाहाकारा १३५ कुडात्मक लाक्षचंडी याग , अतिरुद्र स्वाहाकार, स्वर्गारोहण शैत्यथान, सहस्त्रचंडी, श्री दत्त याग ई. पवित्र विधी वेळोवेळी सम्पन्न होतात. संस्कृत विर्याजनासाठी वेदशाळा उभारली असून त्यात अनेक बुध्दिमान विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. इथे संगीत कला व ताल वाद्याचे शिक्षण दिले जाते.

श्री दत्तधाम मंदिर, चांदा

         अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे . अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर मोहता देवी , देवगड नेवासा ई. हि सर्व ठिकाणे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी .



            अशाच या नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकापासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे - औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी - शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्यामार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे .. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. . अनेक थोर संत महापुरुषांचे वास्त्यव्य या गावात झाले आहे .जुन्या काळी जेव्हा मोघालांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराज सुद्धा या गावात आले होते . आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे . आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय .


                   श्री दत्त साधकाश्रामाची सुरुवात प पु गु ह भ प श्री संत रोहीदासजी महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्याकठोर तपश्चर्येचे प्रतिक म्हणून हा आश्रम उभारला आहे. प पु गु सद्गुरू रोहीदासजी महाराज हे मुलाचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सूर होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेद होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे ठरवले. व या ठिकाणाला अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन श्री दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने आवळून आणलेली श्री दत्त मूर्��ीची स्थापना केली. याच श्री दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसन ग्रस्तांना व्यसन मुक्त केले. व अनेकांना भगवंताचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर मध्ये अध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही. 

               सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.

       दत्त साधकाश्रामच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो .
त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे.
येथील वर्षातील महत्वाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे...
१. गुरुपोर्णिमा - आषाढ शुध्द पोर्णिमा
२. तुकारामबीज सप्ताह - फाल्गुन बीज - ध्यान शिबीर ७ दिवस
३. दत्त जयंती सोहळा - डिसेंबर

अमृतेश्वर मंदिर

हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुना असलेले पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. 

अमृतेश्वर मंदिर


मंदिराची रचना 
मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला असणारा एक अर्धमंडप, मंडप, अंतराळ, व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे.  मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर अलंकृत चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आणि वर कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.

Monday 7 July 2014

श्री निद्रस्त गणपती मंदीर, आव्हाणे बु., शेवगाव.


इ.स.१६०० साली या मंदीराची स्थापणा झाली. हे मंदीर शाहु महाराजांनी बांधले आहे.दादोबा देव व गणोबा देव हे दोघे भाऊ होते. दादोबा देव हे शेती करत असत व गणोबा देव यांना देवकार्य करण्यास मग्न असत. ते दरवर्षी मोरेगाव च्या दिंडीला  जात असत.

Friday 25 April 2014

श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर (गणेशखिंड)




या  मंदीराचा उल्लेख गणेश पुराणामध्ये आहे. क्रांतीकारक सेनापती बापट यांच्या भुमीगत काळामध्ये भालचंद्र गणपती मंदिर परिसरामध्ये राहुन इंग्रजाबरॊबर लढा दिला. येथे त्यांचे भुयार आहे. त्यांनी येथे राहुन बॉम्ब तयार केले. त्यांची या गणपतीवर खुप श्रध्दा होती. त्यांना वायुगमनाची ताकद येथेच प्राप्त केली होती. मंदीरामध्ये श्री गणेशखिंड ट्रस्ट कार्यरत आहे.

श्री घोडेश्वरी देवी


नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव. गावच इतिहास फार जुना आहे. साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव, गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण झाले असावे. कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने सर्व गावकऱ्यांनी पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .

एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला, त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव, फावडे, खोरे, घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला. काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही केले.

काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका साधूने गावकऱ्यांना त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले, त्या नंतर एका शुभ मुहूर्तावर तुळजाभवानी ची पूजा करून विहीर खांदण्यास सुरुवात केली, पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले? त्या दिवशी मंगळवारच दिवस होता, विहीर खांदण्याचे काम चालू असतानाच सहा परसाच्या पुढे आचानक चमत्कार झाला, विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली, सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली

अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन गावाच्या पाटलाच्या स्वप्नात देवी आली आणि `मी घोडेश्वरी देवी आहे` माझी प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात करा, यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून देवी अंतर्धान पावली. सकाळी पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात केली. त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही, बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास सांगितले . दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच अचानक विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .

विहिरीतून प्रगट झालेल्या देवीची मुर्ती ही आश्वरुपी, घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव या नावाचा अपभ्रंश होऊन घोडेगाव हे नाव रूढ झाले याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला, बागायत झाला आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य मुर्ती स्वयंभु आसून कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे, मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी आसून मोठ-मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .

देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************

प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा घाना चालत नाही . कुंभाराचे चाक चालत नाही तसेच गावात कुणी घोडे पळत नाही, स्थानिक सोनार व्यवसाय गावात चालत नाही. कुठलाही गुंड, समाज विरोधक काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही . यात्रेत गोंधळ करणारा, मारामाऱ्या करणारा पुढची यात्रा बघत नाही, हा इतिहास आहे .

आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन मंदिर जीर्नौधाराचे काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे, साथ दिली आहे. सुरक्षाभिंतीचे काम पूर्ण होत आले आहे, सभामंडप एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे.

श्री सदगुरु मठ, मेहकरी


हे अतिशय जुने देवस्थान आहे. ज्ञानेश्वर महाराज पैठ्णला चालले होते त्यावेळेस सर्व भावंडांनी येथे मुक्काम केला होता. हे पवित्र जाग्रुत स्थान आहे. या देवस्थानामध्ये अनेक संत-महात्मे होऊन गेले त्यापैकी,
१. संत नामदेव महाराज
२. संत खुशालभारती महाराज



सध्या, श्री हरी लक्ष्मण महाराज हे मठाधिपती आहेत. भगवान बाबा हे नामदेव बाबांना आपला गुरु मानत असत व त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असत. नामदेव बाबांना वैकुंठ्वास झाल्यानंतर त्यांच्या चाळीसाव्याचे कीर्तन भगवान बाबांनीच केले होते.
मार्गशीष वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी या कालखंडामध्ये कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. आमटी-भाकरीचा भंडारा असतो. २०-२५ हजार लोक भंडारयाचा लाभ घेतात.

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर, पुणवाडी

गाव- पुणवाडी
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
तालुकाअहमदनगर
मुख्यालयनगर
क्षेत्रफ़ळ
लोकसंख्या
साक्षरता दर
तहसीलदार

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर


या मंदीराला ’क’वर्ग भेट्ले आहे. या मंदीराच्या वरच्या बाजुस विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर आहे. समोर देवांची भ्क्त पदुबाई यांचे मंदीर आहे. मंदीराच्या आवारात मोठा सभामंडप आहे, देवाची पुजा रोज पहाटे २:३० वाजता होते. पुजेचे पथ्य खुप कडक आहेत.

श्री सिध्देश्वर मंदीर, सिध्देश्वरवाडी, पारनेर



हे महादेवाचे मंदीर आहे.मंदीराचे काम हे अतिशय भव्य आहे. सर्व बांधकाम दगडी आहे.

हे बांधकाम विश्वकर्मा यांच्या काळाचे आहे. येथे शिलालेखमोडी लिपीमध्ये कोरलेले आढळते. रामायण व महाभारताचा अभ्यास केल्यास पाराशर ऋषींना येथे तपश्चर्या केलेली आहे. या मंदीराचा संबंध पुराणाशी आहे.



चक्रधर स्वामी येथे दर्शनासाठी आले होते. मंदीराच्या मागच्या बाजुस धबधबा वाहतो. मंदीराच्या वरील बाजुस "कृषी वर्त" आहे. तेथे विठ्ठल मंदीर आहे. कृषीवर्ता समोरील कुंडमध्ये एका बाजुस गार व दुसऱ्याबाजुस गरम पाणी असते. मंदीराचे बांधकाम असे आहे की एप्रिल महिन्यात बरोबर पिंढीवर सुर्यकिरण पड्तात.
पुजारी-गिरी महाराज.

केडगावची रेणुकामाता

केडगावची रेणुकामाता


नगर रेल्वे स्टेशनपासुन सुमारे एक मैल अंतरावर केडगाव श्री रेणुकामातेचे जागृत स्थान आहे. शहरालगत असलेल्या या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे. पेशवेकालीन राजवाडे सरदारांनी देवीचे मंदिर उभारले. भरगच्च निवंडुगाचे झाडांनी वेढलेल्या या परिसरात विविध घनदाट वृक्षांमुळे जंगलाचेच स्वरुप प्राप्त झाले. वाघ या जंगलात मुक्तपणे वावरत असे. आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवी दर्शनास वाघोबांची स्वारी डरकाळ्या फोडत येई. त्यामुळे सायंकाळ्च्या आरतीनंतर सर्वजण घरी परतत.

          या मंदिराबाबतची आख्यायिका सर्व प्रचीती अशीच आहे. पुर्वी गुरव कुटुंबात श्री रेणुकामातेच्या कॄपाप्रसादाने पुत्ररत्न जन्मले. बाळाचे नाव आवडीने भवानी असे ठेवण्यात आले. या भवानीने रेणुकामातेची अखंड मनोभावे सेवा केली. श्री क्षेत्र माहूरगड हे त्यांचे मुख्य श्रध्दास्थान साडेतीन शक्तीपीठांतील हे एक पूर्ण पीठ होय. या माहुरगड हे निवासिनी रेणुकामातेच्या नामस्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे. त्यांच्या या निस्सीम भक्तीवर देवी प्रसन्न झाली. “मी आता तुझ्यासोबत येते" असे देवीने सांगताच आनंदाने भवानी गुरव परतीच्या प्रवासाला लागले. केडगावाच्या परिसरात येताच त्यांनी मागे वळून पाहिले. देवीचे दर्शन झाले, मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली. हल्ली त्याच जागेवर स्वयंभू श्री रेणुका देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती अगदी हुबेहुब माहूरगडाप्रमाणेच आहे. देवीच्या समोरच ज्या ठिकाणी भवानी गुरवाने वळून पाहिले तेथे पादुका आहेत.

          रेणुकादेवीच्या मूर्तीशेजारीस तुळजाभवानीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवाचे मंदिर असून शिवभक्तीच्या दर्शनाचा लाभ येथे मिळतो. छोटे विठ्ठल रुक्णिणी मंदिर व भैरवनाथ मंदिरही या परिसरात आहे.

           याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळीच्या स्वरुपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेलमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असलातरीही बारवेलमध्ये पाणी असतेच.

                १९४५ मध्ये के. बाबासाहेब मिरीकरांनी मंदिरापर्यतचा रस्ता ब्हावा, अशी अपेक्षा श्री गुरव कुटूंबीयांनी व्यक्त केली. येथे नवरात्रात घटी म्हणून स्त्रिया राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवऱ्या) आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. शहरालगत असलेले हे मंदिर नवरनवला. मंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा तयार वात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. येथे जाण्या-येण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून जादा गाड्याची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवीदर्शनाने मंत्रमुग्ध होतात. हार फुले-नारळ खाद्यपदार्थ व खेळणीच्या दुकाणे असतात. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढवीले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुकामातेच्या दर्शनाने गेल्यानतंर उत्सवाची सांगता होते.

श्री विठ्ठल-रुख्मिणी (धाकटी पंढरी) मंदीर





शेवगाव तालुक्यातील वरुर बु. मधिल हे मंदीर संपुर्ण गावकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे.





आख्यायिका:
वरुर गावचा खांबट नावाचे पाटील होते. एके दिवशी त्यांच्या स्वपनात विठ्ठल-रुक्मिणी आले व सांगीतले कि "आम्ही काळेगाव टोका गावातील एका इस्माच्या उकांड्यामध्ये आहोत. "पाटील दुसऱ्यादिवशी त्या ठिकाणावर गेले व ती जागा विकत घेतली व तेथे खोद्ण्यास सुरवात केली. खोदत असताना मुर्तीच्या डाव्या डोळ्यावर कुदळीचा घाव लागला, मुर्तीच्या डोळ्यातुन रक्त वाहु लागले. मग मुर्ती थोड्या वर काढल्या. ही गोष्ट कळाल्यावर काळेगाव टोकातील गावकरी तेथे गोळा झाले व त्यांनी मुर्ती गावाबाहेर नेण्यास विरोध केला आणि मुर्ती बैलगाडीत टाकल्या, त्या गाडीचा चकणाचुर झाला. तरीसुध्दा विरोध कायम होता. मग खांबट पाटील मागारी निघाले. जसे पाटील मागारी फ़िरले तशी मुर्ती गायब झाली. हा चमत्कार घडल्यानंतर काळेगाव टोकातील मंडळींनी पाट्लांना थांबवले व मुर्ती नेण्यास परवानगी दिली तेव्हा मुर्ती पुन्हा वर आलेली दिसु लागली. मग मुर्ती गावात वाजत-गाजत आणण्यात आली व तिची स्थापणा करण्यात आली.
आषाढी-पोर्णिमेला काल्याच्या दिवशी मंदीरामध्ये भजन चालु असताना मुर्तीच्या अंगावर घाम येतो, असे गावक्ऱ्यांचे म्हणने आहे.. हे खुप जागृत मंदीर आहे.  



श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, मांजरसुंबा, नगर


गोरक्षनाथांची मुर्ती स्वयंभु आहे. नवनाथांनी येथे १ महिना वास्तव्य केले आहे त्यानंतर सर्व नवनाथांनी स्थलांतर केले. इ.स.१८४६ साली मंदीराचा जीर्णोध्दर झाल्याचा उल्लेख सापडतो. अंबादास भिकाजी कदम येथील पुजारी आहेत.
श्रावण महिन्यात येथे महिनाभर श्रावणी यात्रा असते. मुख्य यात्रा  तिसऱ्या व चौथ्या सोमवारी असते. येथे प्रत्येक महिन्याल्या राहुरीच्या गोरक्षनाथ मंड्ळ यांच्याकडुन भंडारा असतो. कार्तिक शु.१३ ला गोरक्षनाथ प्रकटदिन साजरा केला जातो. महाशिवरात्रीला देवाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते, यासाठी पायी कावडी जातात. आषाढी एकादशीला  यात्रा भरते. शुध्द एकादशीला भंडारा असतो.

श्री विरभद्र (बिरोबा) देवस्थान, मिरी


श्री विरभद्र मंदीर हे मंदीर पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातील प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीराला आतल्या बाजुने काचकाम केलेले आहे.

आख्यायिका :
राजस्थान मधील घोडगिरी येथे भुत्तीरबुआ होते. राजस्थान मधील काही लोकांनी भुत्तीरबुआंच्या कावडींना विरोध केला. त्यावेळेस त्यांनी येथे राहणार नाही असे ठरवले. आधी ते नेवासा येथे आले व धनगरवाडीत बसले, परंतु त्यांना कोणी ओळखु शकले नाही .त्यांनी नंतर कोल्हारला मुककाम केला. मग त्यांनी जिथे मन रमेल तेथे राहण्याचे ठरवले, मिरी येथे त्यांना मेंढरे दिसली, त्यांनी येथेच राहण्याचे ठरवले. मग ते कै.मनाजी भगत यांच्या स्वप्नात दर्शन दिले व मंदीर बांधण्यास सांगितले. बिरोबा त्यांच्या अंगात यायचे व अंगावर लाकडी तलवारीचे वार घ्यायचे. इंग्रज अधिकारयाला ही गोष्ट खोटी वाटु लागली. त्याने स्वत:हा त्यांच्या अंगावर लोखंडी तलवारीने वार केले, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
दसरयानंतर ५ दिवसांनी (कोजागिरी पोर्णिमेला )  येथे वैख असतो. हा वैख ऎकण्यासाठी  आसपासच्या गावातील लोक गर्दी करतात.
या दिवशी  श्री सिताराम मनाजी भगत यांना देवाचे वारे येते, त्यावेळेस ते अंगावर तलवारीचे वार घेतात व वार्षिक भविष्य(पाऊस,नैसर्गिक आपत्ती, किंवा देशात काही  बदल होणारे ) सांगतात. हे मंदीर गोपाळराव मिरीकर यांच्या जागेत आहे. जत्रेच्या दिवशी गावातुन त्यांची मिरवणुक निघते.

श्री विशाल गणेश मंदीर




श्री विशाल गणेश मंदीर, माळीवाडा, अहमदनगर

श्री विरभद्र देवस्थान (शहाडोंगर), बारदरी


वीरभद्र देवस्थान हे ६०० वर्षापुर्वीचे मंदीर आहे. या मंदीराचे बांधकाम हे चांदबीबी महालाच्या कामा बरोबर झाले आहे.
चांदबीबी महालाचे शिल्पकार लिंगायत व जंगम यांची विरभद्र देवावर खुप श्रध्दा होती. हे लोक सकाळी देवाचे दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुध्दा घेत नसत. त्यामुळे ते महिन्यातुन १-२ वेळेस कर्नाट्कास दर्शनासाठी जात असत. त्यामध्ये त्याचां खुप वेळ जात असत. देव गावच्या पाट्लाच्या स्वप्नात आले व सांगितले की मी दिवटे डोंगरावर प्रकट झालो आहे. मुर्ती गावात आणुन  गावातील लोकांनी तिची स्थापना केली. लिंगायत व जंगम लोकांनी मंदीराचे बांधकाम केले. सर्व जंगम समाजाचे हे कुलदैवत आहे. मुर्ती ५॥ फ़ुट उंच आहे.

मंदिरामध्ये वर्षातुन चार उत्सव होतात,
१.मानुरकर महाराज यांची पण्यतिथी सोहळा(आषाढ-शुध्द षष्टी)या दिवशी असतो.
२.इराणी यात्रा-बैलपोळ्याच्या दुसरयादिवशी ही यात्रा असते.
३.कार्तिक पोर्णिमेच्या दुसरयादिवशी जंगम लोकांची यात्रा असते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील जंगम समाजाची सर्व लोक येतात.
४.मार्गशीष शुध्द प्रतिपदेला देवजन्म(उप्परगुढी)साजरी होते.
मंदीराची व देवाची पुजा व सेवा करण्यासाठी ९ पुजारी आहेत.
विरभद्र मंदीर देवस्थान ट्र्स्ट येथे कार्यरत आहे.

श्री देवीभोयरे देवस्थान




श्री देवीभोयरे मंदीर हे देवीभोयरे गावातील, पारनेर तालुक्यातील प्रसिध्द मंदीर आहे. मंदीराची स्थापना कै. शंकर देवराव क्षीरसागर यांनी  सन १९१२ मध्ये केली.




आख्यायिका :
क्षीरसागर कुटुंबाची माहुर गडच्या रेणुकेवर खुप श्रध्दा होती. ते माहुरगडी नवरात्रोत्तसवासाठी आवर्जुन जात असत, पण पुढे वय झाल्यावर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना माहुरगडी जाण्यास जमत नसे. त्यांना रोज पुजेच्यावेळी जाणवायचे की आपला नेम चुकला आणि त्यांना गहिवरुन आले. त्यांची भावभक्ती व तळमळ जगदंबेला जाणवली. देवीने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला. मी भेटायला आले आहे. असे त्रिवार स्वप्न  पडले व स्नप्नांत व स्वप्नात देवीने त्यांना ठावठिकाणा दाखविला.

क्षीरसागर कुटुंब हे प्रथम चोंभुत ह्या गावी रहात असत. चोंभुत हे देविभोयरे येथुन १८ किमी वर नैऋत्य दिशेस आहे. त्यांना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन जी जागा दाखविली ती म्हणजे देविभोयरे गाव होय. असे स्वप्न २/३ वेळेस पडले. सतत स्वप्नदृष्टांत झाल्यावर व जागाही दिसल्यावर क्षीरसागरांनी त्याठिकाणी जाऊन जागा खणण्यास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे तिथे पाषाणाची तांदळाकृत प्रतिमा व सभोवती हळदी-कुंकवाच्या भरलेल्या पेट्या, अशा स्वरुपातील निर्गुण जगदंबा तांदुकार मुर्ती सापडली. त्या दिवसाचा योग अंत्यंत उज्जवल असल्याचे जाणुन, तिथल्यातिथेच एक वेदिका रचुन ती मुर्ती समंत्रक स्थापण केली. देवीच्या मुर्तीसमोरील सिंह जे धर्मस्वरुप मानले जाते ती सोनपितळेची मुर्ती १६.५ किलो वजनाची आहे. भुविवरात देवी प्रकट झाली म्हणुन त्याला देवीभुविवर म्हणु लागले व त्याचे आज देवीभोयरे म्हणुन नाव पडले

श्री क्षेत्र हनुमान टाकळी


श्री क्षेत्र हनुमान टाकळी ता. पाथर्डी येथे श्री संत समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते गोमयीन श्री रामभक्त हनुमानाची वरदह्स्ताची एक भव्य मुर्ती स्थापून आज ३५० वर्षे होऊन गेली. पुर्वकालापासून ते आजवरच्या इतिहासात देवमुर्तीचे निर्माणात, श्री समर्थांची ही एक क्रांतदर्शी, दिव्य दृष्टी प्रत्यक्ष गोमयातून देवत्व साकार करुन सकलजनांचे कल्याणार्थ, साधकास वा भक्त-भाविकास वांछित प्रसादप्रदायक उपासनेत तेजस्वी व उन्नत अनुभव देणारी त्याचप्रमाणे विशेष जागृतता, निर्मिणारी म्हणून दूरदूरवर सहजच प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे समर्थांच्या त्यावेळीच्या भारताच्या भीषण काळात या महान रामभक्ताने भारतभर ११०० मारुती व धर्मस्थाने निर्माण करुन भारताचे धर्म वैभव स्थिर केले.

सूज्ञांच्या मते हे स्थान हर्षवर्धनाच्या काळात झालेल्या एका महान यज्ञाची पावनभूमी म्हणून इतिहास नमूद आहेच. याच परिसरामध्ये उत्तरवाहिनी दोन नद्यांचा संगम पुराणकालापासून विशेष प्रसिध्द आहे. महर्षि भगवान व्यासांनी लिहिलेल्या अठरा पुराणांपैकी प्रथमचे गणले जाणारे पुराण ब्रम्हपुराण यामध्ये गोदावरीच्या दक्षिणकाठी ६० विशेष तीर्थ आहेच. पैकी वृध्दासंगम तीर्थ म्हणून एक विशेष अख्यायिका वृध्देश्वर देवालयासहित आलेली आहे. त्यात येथील सुंदर गुफेचाही उल्लेख आलेला आहे. हे सारे विचारात घेता श्री समर्थ रामदासांनी या पावनभूमीमध्ये त्या काळी टाकळीच्या झाडांचे जंगल असतानाही भक्ति-शक्ति दाता मारुती स्थापन करुन मोठाच धर्मोद्देश साधला आहे.


आज या परिसरात परंपरेने चालत आलेली आषाढ वद्य चतुदर्शीला रहाड यात्रा होत असते. या यात्रेत लांबून येणारे अबालवृध्द सहभागी होतात व विस्तवावरुन चालतात. हे येथील एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत ही पावनमुर्ती साध्या माळवदी व मातीचे मंदिरात खणात होती. परंतु विश्वानुभूती स्वांगाने घेणारे महान संतद्वय श्री समर्थ रामदास स्वामी व श्री संत मोरेश्वरनाथ अर्थात श्री बाबा महाराज आर्वीकर श्री क्षेत्र मोक्षधाम माचणूर या दिव्यत्म्यांनी टाकळीच्या हनुमान मंदिराचा जिर्नोध्दार करावा म्हणून श्री माधव स्वामी यांना सुचित केले. या मंदिर जीर्णोध्दाराच्या कामाचा प्रांरभ माघ शुध्द पोर्णिमा दि. ९ फेब्रुवारी २००९ रोजी होत आहे.

श्री दत्त देवस्थान ट्र्स्ट, सावेडी, अहमदनगर


अहमदनगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना दत्तावतारी सत्पुरुष प.पू.श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी १९७४ मध्ये केली. वेदविद्येचे संरक्षण व संवर्धन हा ह्या ट्रस्टच्या स्थापनेचा प्रमुख हेतु आहे. आपली ही प्राचीन विद्या काळाच्या ओघात लोप पावू पहात आहे. वेदांच्या अनेक उपशाखांपैकी (सुमारे ११००) आजमितीला काही मोजक्याच शाखा अस्तित्वात आहेत व त्यातील जाणकारांची संख्याही अत्यंत अल्प आहे. पूर्वी राजाश्रयाच्या आधारे ही विद्या जतन केली गेली. आज लोकाश्रयाच्या आधारावर तिचे जतन करणे आवश्यक आहे, हे ओळखून प.पू.सदगुरुंनी ट्रस्टची स्थापना केली.
वेदविद्या ही आपल्या धर्माचा पाया आहे. वेद हे अपौरुषेय आहेत. वेद ऋषिमुनींना ध्यानावस्थेत ऐकू आले, त्यांनी वेदांचे उच्चारण केले व आपल्या शिष्यांना शिकवले. वेद हे मंत्रस्वरुपात असून त्यांच्या उच्चारणाला फार महत्त्व आहे. योग्य व्यक्तींकडून त्यांचे शास्त्रशुध्द उच्चारण झाल्यास ईश्वरी शक्ती प्रकट होते. वेदांच्या उच्चारण झाल्यास ईश्वरी शक्ती प्रकट होते. वेदांच्या उच्चारणाने सर्वच जीवसृष्टीवर चांगले परिणाम होतात. वेद अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत.
वेदविद्या ही पाठांतरावर आधारित विद्या आहे. वेदध्ययनात योग्य उच्चारांना फार महत्त्व असल्याने वेद गुरुमुखातूनच शिकावे लागतात. वेदपठण करणाऱ्यांना आहार-विहार, आचार-विचार यांचे नियम फार काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यामुळे वेदविद्या उत्तम रीतीने शिकण्याकरिता गुरुकुल पध्दतीची आवश्यकता आहे. एक वेद शिकण्यासाठी सुमारे १२ वर्षाचा काळ लागतो. तसेच पाठांतर व योग्य उच्चार यांचे संस्कार बालपणीच्या संस्कारक्षम वयातच व्हावे लागतात. हे लक्षात घेऊन १९८८ साली ट्रस्ट तर्फे "वेदान्त" ही वास्तू बांधण्यात आली. सुमारे १०० विद्यार्थी गुरुकुल पध्दतीने शिकू शकतील एवढी सोय येथे विनामूल्य करण्यात आली आहे. शिक्षणासाठी विद्वान व आचारसंपन्न आचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मोफ़त वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुध्दीला तेज यावे म्हणून गाईचे दूध, तूप मुलांना दिले जाते. त्यासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावर स्वामी नृसिंह सरस्वती तपोवनात गोधन सांभाळले आहे.
वेदविद्येबरोबरच दुर्मिळ धार्मिक ग्रंथांचे जतन करुन, त्यांचे योग्य प्रकारे रक्षण करण्याचे कार्यही संस्थेने हाती घेतले आहे. दुर्मिळ असे अनेक ग्रंथ येथे जिज्ञासूंना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत.
वैदिक धर्म हा आचरणावर आधारित आहे. आजच्या काळानुसार तो कसा आचरावा ह्याचे गुरुदेवांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले ते "गुरुवाणी" आणि "अमृत कलश" या पुस्तक मालिकांतून प्रकाशित केले जाते. ह्या ग्रंथसंपदेद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे केले जाते. तसेच धर्माचे स्वरुप सामान्यजनांना उलगडून सांगण्यासाठी संस्थेतर्फे ज्ञानसत्रेही आयोजित केली जातात. ह्यासाठी श्री महालक्ष्मी मंडप ही भव्य वास्तू बांधण्यात आली आहे.
पुढील काळात सामान्य भक्तांना चिरंतन आधार मिळावा ह्यासाठी एक भव्य दत्तमंदिर बांधण्याचा संकल्प प.पू. सदगुरुंनी सोडला होता. तो गुरुदेवांनी भक्तांकरवी पूर्ण करुन घेतला. गुलाबी रंगाच्या बन्सी पहाडपूर दगडात, कोरीव कामाने सुशोभित अशा ह्या सुंदर मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शृंगेरी पीठाधीश्वर जगतगुरु श्री भारतीतीर्थ महास्वामी यांच्या परमपावन करकमलांनी दि. ११ जुलै २००७ रोजी संपन्न झाली. संपूर्ण भारताचे भूषन असे हे मंदिर सर्व दत्तभक्तांना श्रध्देचे व अभिमानाचे स्थान आहे.
या दत्तमंदिरातील देवदेवतांची त्रिकाल पूजा व आरती केली जाते. तसेच तेथील देवतांवर रुद्र, पवमान, पंचसूक्त इ. अभिषेक नित्य केले जातात. भक्तांतर्फे साधा अथवा दुधाचा अभिषेक, सहस्रनाम पाद्यपूजा, शाश्वत पूजा, लघुरुद्र केले जातात. याशिवाय श्रीदत्तदेवस्थान ट्रस्टतर्फे वेळोवेळी नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेश याग यांसारखी धार्मिक अनुष्ठानेही केली जातात. गुरुपौर्णिमा, श्री दत्तत्रेय जयंती, श्री शंकराचार्य जंयती आणि प.पू. गुरुदेवांची जयंती हे उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
श्री दत्त देवस्थानामध्ये गुरुचरणांचे दर्शन आपल्याला सकाळी ७ ते ११,दुपारी ३ ते ५ व रात्रौ ७.४५ ते ८.३० या वेळात होऊ शकते.

संस्थेचा पत्ता :
श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, श्री दत्तात्रेय निवास, वेदांत नगर, मनमाड रोड, अहमदनगर - ४१४ ००३.
दूरध्वनी : (०२४१)२४२३५८५, (०२४१)२४२४८७५.

नृसिंह मंदीर (भातोडी)


मंदीराची स्थापना १३०० -१४०० या काळात झाली आहे. कान्हो नर्सी नावाचा प्रधान हा शाही दरबारात होता. तो खुप ईमानदार होता. परंतु दरबारातील काही मंड्ळींनी त्यांच्या विरुध्द बादशहा चे कान भरले. यामूळे बादशहाने त्यांना प्रधान या पदावरुन निलंबित केले. त्यावेळेस त्यांनी भातोडी येथे अनुष्ठान केले व नवस बोलला. ठीक ४ दिवसांनी त्यांच्यावरील आरोप टळला व बादशहाने त्यांना दरबारात बोलावुन घेतले व त्यांना त्यांचे पद परत देण्यात आले. त्यांनी बोललेल्या नवसाप्रमाणे मंदीराची उभारणी केली. मंदीराला भक्क्म तटबंदी करुन त्यावर मंदीर बांधले आहे. मंदीराच्या समोर मेहकरी नदी आहे या नदिचा उगम आगडगाव-रतडगावच्या डोंगरावरुन झाला आहे.

याच मंदीराचे प्रतीरुप  पाकिस्थानात कराचीमधील नरसिमपाल या भागात आहे. या मंदीरावर आनंद जोशी यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
या मंदीरामध्ये पांडुरंग खंडु राऊत हे व्रुध्द बासरीवाद्क खुप सुंदर बासरी वाजवतात.

पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी

पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी
हे आतिशय भव्य व प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीरचे संपुर्ण काम काचेमध्ये केलेले आहे . येथील मंदीराच्या बाजुला विहीर आहे ,या विहीरीमधुन नवरात्रामध्ये सोन्याची घागर वर येते असे ,असे स्थानिक लोकांचे म्हणने आहे.

आख्यायिका :
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावतील जठार घराण्यात एक व्यक्ती राह्त होती. तो माहुरगडाच्या जगदंबेची अतिशय मनापासुन भक्ती करत होता. त्याचे लग्न होऊन बरेच दिवस झाले ,परंतु त्याला मुलबाळ होईना म्हणुन त्याने माहुरगडच्या जगदंबेला मुलबाळ होऊ दे, असे साकडे घातले व तो जगदंबेची मनापासुन भक्ती लागला .त्याला एके दिवशी रात्री स्वप्न पड्ले की ,स्वप्नात देवीने सांगितल्याप्रमाणे तो भल्या पहाटे उठुन शेताता स्व्प्नात सांगितलेल्या ठिकाणी गेला. तेवढ्यात एका छोट्याशा बालकाचे रड्णे ऎकु आले .नंतर तो आवाजाच्या दिशेने जावु लागला .जवळ गेल्यानंतर त्याला फ़ुललेल्या तरवडाच्या झाडाखाली एक सुंदरशी मुलगी द्रुष्टीस पड्ली .त्याने ते छोटेसे बालक अलगत उचलुन आपल्या घरी आणले . तिला पाहताच त्याच्या पत्नीला व घरातील सर्वांना आनंद झाला ते दोघेही त्या मुलीचा सांभाळ ,पालणपोषण करु लागले. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. जगदंबेच्या क्रुपेमुळे तिला घरातील सर्व मंड्ळी अंबिका असे म्हणत. अंबिका आता उपवर झाली .तिचे लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटु लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछ्त्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकेचा विवाह ठरला. योग्य वेळेत तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावु येऊ लागली. दरंदलेंचा शेतीचा व्यवसाय फ़ार मोठया प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकरयांना इरजीकाचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकेला न्याहरीसाठी स्वंपाक करावयास सांगितले. इरजिकीचा दिवस उगवला .अंबिकाने स्वंपाक करण्यास सुरवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले. सासरे भाकरी घेण्यासाठी शेतावरुन घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरुन ठेवले होते. सासरयाने टोपले उचलुन शेतावर नेले. न्याहरीची वेळ झाली होती .शेतक्ररयांना त्यांनी न्याहरीसाठी हाक मारली. भाकरी कालवणाचे टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन सासरयांना विचार पडला. हे जेवण सर्वांना कसे पुरणार ? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की थॊडी थॊडी भाकरी खाऊया तर सासरयांनी जेवण वाढण्यास सुरवात केली. जेवढ्या भाकरी उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसु लागल्या .कालवणही तेवढेच दिसु लागले. सर्वांची जेवणे पोटभर जेवणे झाली तरी टोपल्यात पाच भाकरी व शेडगाभर कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्यचकित झाले .ही बातमी शेतकरयांमार्फ़त  हा हा म्हणता संपुर्ण रुई गावात पसरली . अंबिकेच्या सासुला ही बातमी कळली ती अतिशय नाराज झाली .तिला वाटले की कोणीतरी काट्कीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही,असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच दुसरयादिवशी अंबिकेला माहेरी पाठवण्याची. सुनबाईना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरयांची नेमणुक झाली. त्याकाळी कुठल्याही प्रकारची वाहने नव्हती. सासरयाच्या घरी एक सुंदरशी घोडी होती .ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरु झाला. विसापुरच्या अलिकडे नगर तालुक्यातील घोसपुरी नावाचे गाव आहे. तेथपर्यंत येण्यास दुपार झालीहोती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावातील एका विहीरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. त्या विहीरीवर पाणी काढण्यासाठी काहीच साधन नव्हते. त्या विहीरीच्या मालकास विचारले असता त्यानेही काही साधन नसल्याचे सांगितले,म्हणुन त्यांनी थोडे पुधे जावुन नदीच्या कडेला झरा  पाहिला व त्या ठिकाणी अंबिका पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेतले व सासरयांना दिले व  अंबिका देखील पाणी प्याली. झरयाजवळील निसर्गरम्य परिसर पाहुन अंबिकेचे मन रमले व अंबिका काहीतरी निमित्त करुन सासरयापासुन दुर अंतरवर गेली .अंगावरील सर्व दाग-दागिने झरयाजवळील एका दगडाखाली  ठेवुन ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला अंबिका काही येईना.सासरा विचारात पडला. त्याने अंबिका म्हणुन मोठ-मोठ्याने हाक मारण्यास सुरवात केली . तर गावापासुन २ कि.मी अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावरुन जी असा आवाज एकु येवु लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसुन टेंभीच्या डोंगरावर धावत गेला. तेथे जावुन पाहतो तर अंबिका कोठेच दिसेना, टेंभीच्या डोंगरावरुन अंबिका अशी हाक मारली देवीने त्यांना गुप्त झालेल्या ठिकाणावरुन आवाज दिला .सासरे पुन्हा घोड्यावर बसुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. त्या घोड्याबरोबर त्या घोड्याचे शिंगरु होते. तेथे येवुन आपल्या सुनेस शोधले परंतु देवी दिसली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा देवीला हाक मारली. त्यावेळी देवीने टेंभीवरुन आवाज दिला पुन्हा पुन्हा असे घडत राहिल्याने घोडी व शिंगरु टेकडी चढता चढता थकुन गेले .घोडी व शिंगरु ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी त्यांचे पावले पाषाणात उमटले. त्या पाऊलखुणा आजही जशाच्या तशा दिसतात.
सासरे घोडी व शिंगरु घेवुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. अंबिकेचा शोध घेता-घेता सासरे फ़ार थकले व विचार करु लागले की ,घरच्या व माहेरच्या लोकांना काय सांगावे? या प्रश्नाचा विचार करता करता त्यांनी जीव सोड्ला .हे पाहुन घोडी व शिंगरु त्या देहाच्या कडेने फ़िरु लागले व किंचाळु लागले.मालकाची कुठल्याही प्रकारची हालचाल न दिसल्यामुळे त्या बिचारया मुक्या प्राण्यांनीही आपला देह सोडला. पद्मावती सासुच्या स्वप्नात गेली व गुप्त झालेल्या ठिकाणाची माहिती द्रुष्टांत रुपात सांगितली. झरयाजवळील एका दगडाखाली दाग-दागिणे ठेवले आहेत त्याच ठिकाणी सासरे,घोडी व शिंगरु यांचा त्याच ठिकाणी देहत्याग झालेला आहे. दरंद्ले कुटुंबातील व्यक्तींनी त्या ठिकाणी येवुन शहनिशा केली. त्यावेळी घोसपुरी गावातील लोकांनी त्या ठिकाणी सासरयांची व घोड्याची समाधी बांधली व ज्या दगडाखाली दाग-दागिने ठेवले होते ते पाहण्यास गेले.त्या ठिकाणी  दाग-दागिने व तांदळा(देवीचा) सापडला .ते दाग-दागिने त्यावेळी दरंदले कुटुंबीयांच्या स्वाधीन झाले. तांदळा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आले व मंदिरा तांदळाची विधी विधीनपुर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजही तो तांद्ळादर्शनासाठी खुला केला जातो.

श्री क्षेत्र मळगंगा देवी, चिंचोली, पारनेर


मळ्गंगा देवी ६५० गावांचे कुलदैवत आहे. यात काही गावांचा काठ्यांचा मान आहे. मंदीराला ७४ एकर जमीन आहे.येथील पुजारी हे वडीलोपार्जित आहेत.
पुजारी -दत्तात्र्य जग्गनाथ वाघमारे.



आख्यायिका :
पारनेर चे पराशर ऋषी पारनेर येथे होम-हवन कार्यक्रम त्यांचा नित्यनियमाने चालत असे.त्यांना त्रास देण्यासाठी म्हणजे त्यांच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी ’धुम्र’राक्षसाने प्रयत्न केले होते. मग पराशर ऋषींनी गणपतीची आराधना केली. तो गणपती म्हणजे गणेशखिंडीतील गणपती, ज्यावेळेस गणपतीला हा राक्षस  आवरला नाही, त्यावेळी त्याने आईची आराधना केली म्हणजे पार्वतीची. पार्वतीने सांगितले की तो राक्षस माझ्याच्यानेही आवरणार नाही. त्यावेळी तिने शंकराच्या जटातील "मुळगंगा"हिच्या साह्याने धुम्र राक्षसाशी युध्द केले त्यात मळगंगेला यश आले. त्या डोंगराचे नाव धुम्या डोंगर म्हणुन ओळखले जाते. तिथुन डोंगर सोडुन मळगंगा डोंगर सोडुन  चिंचेच्या बनात आली. त्यामुळे या गावाला "चिंचोली" हे नाव पड्ले आहे. त्याठिकाणी मळगंगेचे मन रमले त्या ठिकाणी तिची स्थापना झाली. त्यावेळी पासुन ही "मळ्गंगा" या नावाने व पार्वती "वडजाई" या नावाने ओळखले जाऊ लागले. या मळगंगेला कौल लावला जातो. चैत्री पोर्णिमेला देवीला हळद  लावण्याचा कार्यक्रम होतो. चैत्री वैद्य सप्तमीला देविचा उत्सव असतॊ. ज्या महिलांना बरेच वर्ष आपत्य होत नाही त्या देवीला कैल लावण्यासाठी येथे येतात आणि देवीला कौल लावुन आपली मागणी मागतात. यात्रेच्या दिवशी "हेका" म्हणुन कार्यक्रम असतो. मळगंगेच्या सात ठिकाणांपैकी हे मुळ ठिकाण आहे. पारनेरपासुन मंदीर ८ किमी अंतरावर आहे. मंदीराचे विशेष म्हणजे नवरात्रत संपुर्ण गावाचे घट मंदीरातच स्थापण होतात. "मळेवडजाई देवस्थान ट्रस्ट " येथे कार्यरत आहे.

श्री तुळजाभवानी माता (सप्तऋंगी माता) मंदीर, बुऱ्हाणनगर


महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे बुऱ्हानगर (अहमदनगर) हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचे मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे विषेश!
पैठणच्या शालिवाहन राजघराण्याला उतरती कळा लागल्यानंतर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हानगरला आणून ठेवले. त्यावेळी या ठिकाणचे नाव अंधेरी नगरी होते. याठिकाणी तेलंगा नावाचा राजा होता. देवीची मूर्ती तब्बल ३०० ते ४०० वर्षे याठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत आडनावाने ओळखले जाऊ लागले. आज या घराण्याचे वंशज अर्जुन किसन भगत हे आहेत. तेलंगा राजा कर्नाटकवर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. डोंगराळ परिसर असलेल्या चिंचपूर(तुळजापुर) मध्ये मूर्ती सुरक्षेसाठी ठेवली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. आज श्री तुळजा भवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. त्यानंतर बहामनी राजवट सुरु झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हानगरला आणली.
अहमदनगरला निजामाचा त्रास होऊ लागल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामच्या नजरेपासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी अपार कष्ट घेतले. निजामाची करडी नजर चुकवत मूर्ती परत नगरला नेली आणि निजाम राजवट संपुष्टात येताच तुळजापुरला आणली गेली. जानकोजी हे देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांची देवीवर अपार श्रध्दा होती. देवीने त्यांना एकदा मुलीच्या रुपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले. या अंबिकाने जानकोजीच्या तेलाच्या व्यवसायात त्यांना सर्वार्थाने मदत केली. या व्यवसायामुळे सावकाराच्या देण्यातून जानकोजी मुक्त झाले. ते श्रीमंत होऊन पंचक्रोशीत प्रसिध्द व्यापारी म्हणून परिचित झाले. बुऱ्हानगरच्या बादशहाची अंबिकेच्या सौंदर्यावर नजर गेली. बादशहाने अंबिकेला आणण्यासाठी सैन्य धाडले. मात्र तिला स्पर्श करण्याचे धाडस कुणाचेच झाले नाही. त्यावेळी अंबिकेने शाप दिला की बुऱ्हानगर निर्मनुष्य होईल. त्यामुळे गावात रोगराई वाढली. अनेक जण गाव सोडून गेले. मात्र जे ख्ररे देवीभक्त होते; ते तेथेच राहिले. त्यानंतर देवीने जाणकोजींना खरे रुप दाखविले व ती लुप्त पावली.
जानकोजी देवीविना वेडेपिसे झाले. ते फिरत तुळजापूरला आले. देवीची करुणा भाकू लागले व ते जीव देणार इतक्यात अंबिका प्रकट झाली. त्यावेळी जानकोजी देवीला म्हणाले, मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन. तेव्हापासून आजतागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही. अहमदनगर पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या बुऱ्हानगरात भगत (देवकर) घराण्यातील मंडळींनी १९९३ साली स्वखर्चाने शेतजमीन विकून देवीचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पूजेचे व मानपानाचे अधिकार व व्यवस्था विजय अर्जुन भगत पाहतात.
दरवर्षी नवीन पालखी नगरजवळील हिंगणगावात केली जात होती. त्यानंतर ती राहुरीमध्ये बनविली जात आहे. पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी पालखीसाठी लागणारे साहित्य अर्जुन भगत पुरवितात. गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पालखी तयार केली जाते. पितृ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी राहुरीतून निघते. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप तिसऱ्या माळेला बुऱ्हानगरच्या यात्रेदिवशी दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. या सोह्ळ्याला हजारो भक्त हजेरी लावतात.
पालखी उचलण्यासाठी पुढील बाजूस कापूरवाडी, वारूळवाडी, बुऱ्हानगर येथील लोक हजेरी लावतात. पाच-सहा तास पालखी खेळविली जाते. पालखीला सर्व अठरा पगड जातीचे लोक हात लावतात. ही प्रथा चारशे ते पाचशे वर्षापासून सुरु आहे. नागरदेवळे गावी पालखी गेल्यावर पुढच्या शिडीस सर्व हरीजन लोक धरतात व मागच्या शिडीस माळी व इतर समाज बांधव धरतात. भिंगार कॅपच्या हद्दीत पालखी गेल्यावर प्रथम ती हरीजन वस्तीवर नेण्यात येते. त्यानंतर भिंगार वेशीच्या आत ब्राम्हण गल्लीतून पालखीच्या ओट्यावर विसावते. दरम्यान त्याच वेळेस पलंग भिंगार मारुती मंदिरात येतो. त्यावेळी पलंग पालखीची भेट होते. भिंगारला मोठी यात्रा भरते.
तब्बल पाचशे वर्षाचा इतिहास प्राप्त असलेली पलंग पालखीची मिरवणूक आजही तुळजापुरकरांसाठी एक आनंददायी आणि सदाबहार सोहळा आहे. या पालखीचे मानकरी येथील पुजारी चंद्रकांत झाडपिडे यांच्या घरी आठ दिवस मुक्कमी असतात.

श्री क्षेत्र भगवानबाबा गड, पाथर्डी


भगवानबाबांचे पुर्वीचे नाव आबाजी तुबाजी सानप. सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड येथील ते मुळ रहिवासी होते. भगवानबाबांचा जन्म श्रावण वद्य पंचमी १८९६ साली झाला. भगवानबाबा लहानपणापासुनच अतिशय हुशार आणी चंचल होते. याच वयात त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत भगवानबाबा प्रथम दिंडीस गेले. पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिक महाराजांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिक महाराज हे त्यांचे प्रथम गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील बनकर स्वमी यांच्याकडे गेले त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. भगवानबाबांनी नारायणगडावर राहण्यांचा हट्ट धरला, तेव्हा माणिक महाराज म्हणाले मला काहितरी अनुग्रह दे म्हणुन भगवानबाबांनी  गडावरुन उडी मारली. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
काही काळ उलटल्यानंतर तेथीलच वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी बाबांना त्रास देण्यास सुरुवात केली व नारायणगड सोडून जाण्यास भाग पाडले. या सर्व प्रकारानंतर  बाबांनी तपश्चर्येस हिमालयात जाण्याचे ठरवले. तेव्हा खरवंडीचे बाजीराव पाटलांनी भगवानबाबांना ढुम्यागडावर येण्यासाठी आग्रह करुन घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले व सदमार्गाला लावले.
१९५८ साली यशवंतराव चव्हाण यांनी भगवानबाबागडावर श्री विठ्ठलाच्या मुर्तीची स्थापना करुन भव्य दगडी मंदिरही बांधले. तसेच गडावर भगवान विद्यालयाची स्थापनाही केली. भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसुन ज्ञानेश्वरी वाचली.
||बैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी.||
भगवानबाबांचा मृत्यु पौष-पोर्णिमा १९६५ साली झाला. पंढरपुर, पैठण अशा बऱ्याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.
भगवानबाबानंतर भीमसेन महाराज यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. त्यानी ४० वर्षे गडावर काढले. भगवानबाबांच्या चालिरिती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यु झाला. त्याच्यानंतर गडाचे तिसरे उत्तराधिकारी म्हणुन श्री डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची निवड झाली व तेथुन पुढे गडाचा विकास वाढिस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या.
नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापिठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.



श्री क्षेत्र काळ भैरवनाथ, आगडगाव


श्री शंकराच्या आज्ञेवरुन काळभैरव काशीवरुन सोनारीकडे निघाले. सोनारीला जाताना ते याच दंडकारण्यातून चालले होते. जाता जाता ते एका झाडाखाली बसले. त्या ठिकाणी (सध्याचे आगडगाव) काही गुराखी मुलं आपली गुरे चारत होती. दुपारी जेवणाची वेळ होती मुले आपापली शिदोरी सोडून जेवणास बसले. त्यातील एका मुक्या मुलाचे लक्ष श्री भैरवनाथांकडे गेले. त्यानी आपल्या मित्रांना हातवारे करुन सुचविले की नाथांना जेवणासाठी बोलवा, परंतु इतर मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या मुलाने आपली शिदोरी नाथांसमोर ठेवली व जेवणाचा आग्रह केला. नाथांनी त्या मुलांमध्ये जेवण केले. ते तृप्त होऊन मुलांवर प्रसन्न झाले व त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या मुक्या मुलाला वाचा फुटली. तो अत्यानंदित होऊन बोलू लागला. या ठिकाणी पाणी नव्हते म्हणून नाथांनी तेथे त्रिशूल रोवला. तसा पाण्याचा उगम झाला मंदिराच्या जवळच असलेल्या या तलावावर त्रिशुलबा हे दैवत आहे.

देवाने आग्रह केल्यानंतर त्या मुक्या मुलाने वर मागितला, की कायम तुमचे दर्शन व्हावे म्हणून या ठिकाणी थांबावे. त्यानुसार नाथांनी तथास्तू म्हटले व याच गावात थांबेन असे वचन दिले तसेच मला जेवण मिळालेल्या या भूमीत जो अन्नदान करील, त्याचे दुःख नाहीशे होतील, येथे केलेले अन्नदान मी आनंदाने ग्रहण करील असा वर दिला. (ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन ट्रस्टने सध्या देवस्थानाजवळ बाजरीची भाकरी व आमटी असा महाप्रसाद सुरु केला आहे.)
त्यानंतर नाथांनी राक्षसांकडून एकाच रात्रीतून मंदिर बांधून घेतले. त्या राक्षसांनी मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना करुन गंगास्नान घातले. आगडमल, देवमल, रतडमल अशी या तीन राक्षसांची नावे आहेत. त्यांच्या नावांवरुनच आगडगाव, रतडगाव व देवगाव ही तीन गावे ऐकमेकांपासून प्रत्येकी ४ कि.मी अंतरावर वसलेली आहेत. (मंदिराच्या प्रथम दरवाजावर तीन दगडी राक्षसी मुंडके बसविलेले आहे ते या कथेची साक्ष देतात.) सध्या ही तीनही गावे अत्यंत डोंगराळ प्रदेशात असूनही समृध्द आहेत.

श्री भैरवनाथांना शंकराच्या आज्ञेवरुन पुढे सोनारीला जाऊन आपले कर्तव्य करावयाचे होते. ब्रह्मदेवाचा दैत्यांना वर होता, की अविवाहिताच्या हातून मृत्यू नसावा. त्यांच्या रक्ताच्या एका थेंबातून अनेक राक्षस निर्माण होतील, त्यामुळे भैरवनाथांना विवाह करणे आवश्यक होते. ठराविक घटकेत लग्न केले, तरच मी थांबेन, या अटीवर श्री भैरवनाथांचा विवाह आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीशी ठरला; परंतु अटीप्रमाणे लग्न कोंबडा अरवण्यापूर्वी न झाल्याने ते पुढे निघून गेले. पुढे जोगेश्वरीने सोनारपासून तीन कि.मी अंतरावर असलेल्या मुख्याग्राम (मुगाव) येथे शेषाच्या पोटी योगिनीचा अवतार धारण केला व चैत्र वद्य अष्टमीस रात्री बारा वाजता श्री भैरवनाथांचा देवी योगेश्वरीशी (जोगेश्वरी) विवाह झाला. लग्नांनतर श्री भैरवनाथांनी दैत्यांचा संहार करण्यास सुरुवात केली. दैत्यांवर वार केल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षसांची निर्मिती होऊ लागली. त्यावेळी श्री भैरवनाथांनी शंकिनी, कंकनी, डंकिनी अशा चौषष्ट योगिणींची आराधना करुन घेतले. दैत्यांबरोबरच युध्दात या योगिणींनी आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. दैत्यांबरोबरच युध्दत या योगिणींची दैत्यांचे रक्त जमिनीवर पडू न देता ते प्राषाण केले आणि नंतर श्री भैरवनाथांनी दैत्यांचा संहार केला. युध्द थांबल्यानंतर शस्त्र धुण्यास पाणी नव्हते म्हणून नाथांनी त्रिशुल रोवला व त्याठिकाणी पाणी निघाले. आजही ते स्थान लोहतीर्थ म्हणून ओळखले जाते. श्री भैरवनाथांनी राक्षसांचा नाश केला याचा आनंदोत्सव म्हणून सोनारी येथे चैत्र वद्य अष्टमीस सहा दिवसाची मोठी यात्रा भरते.
त्याचप्रमाणे श्री क्षेत्र आगडगाव येथे चैत्र शुध्द पौर्णिमेनंतर हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी (तिसऱ्या दिवशी येणारा रविवार सोडून) मोठी यात्रा भरते.

भुतांची यात्रा
भूत म्हटलं, की माणसाच्या अंगाला शहारे फुटतात. पण भुताची यात्रा हे या गावचं मुख्य वैशिष्ट्य. अगदी पूर्वीपासूनची असलेली हि यात्रा पाहण्यासाठी माणसांनी जाऊ नये असे संकेत आहेत. मुख्य यात्रेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) रात्री १२ वाजता ही यात्रा भरते, असे सांगितले जाते. या दिवशी भैरवनाथ मंदिर पारिसरात कोणीही थांबत नाही. या यात्रेबाबत काही प्रसंग सांगितले जातात. कै. गोपीनाथ हनुमंत कर्पे हे आपली तेलाची घागर दीपमाळेजवळ विसरले. घागर विसरलो, हे त्यांच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आले. मुख्य दरवाजा जवळ गेले असता त्यांना भयानक दृश्य दिसले. हातात टेंभे, अक्राळ-विक्राळ रुपे असलेली भुते आणि त्याचा नाच पाहून ते घामाघुम झाले. भेदरलेल्या स्वरात त्यांनी भैरवनाथांचा धावा केला त्यामुळे श्री कालभैरवनाथांनी त्यांना दर्शन देऊन त्यांची तेलाची घागर आणून दिली व भूताच्या यात्रेविषयी सांगितले. येथे भरत असलेल्या या यात्रेची कल्पना इतरांना देऊ नकोस असेही सांगितले. परंतु एखादी घटना माण्सांच्या मनात जास्त दिवस राहत नाही. त्याप्रमाणे गोपीनाथांच्या मनात ही गोष्ट जास्त दिवस राहिली नाही आणि त्यांनी घडलेला प्रकार सर्व सांगून टाकला. त्याच वेळी ते मरण पावले.