Friday 25 April 2014

श्री क्षेत्र मळगंगा देवी, चिंचोली, पारनेर


मळ्गंगा देवी ६५० गावांचे कुलदैवत आहे. यात काही गावांचा काठ्यांचा मान आहे. मंदीराला ७४ एकर जमीन आहे.येथील पुजारी हे वडीलोपार्जित आहेत.
पुजारी -दत्तात्र्य जग्गनाथ वाघमारे.



आख्यायिका :
पारनेर चे पराशर ऋषी पारनेर येथे होम-हवन कार्यक्रम त्यांचा नित्यनियमाने चालत असे.त्यांना त्रास देण्यासाठी म्हणजे त्यांच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी ’धुम्र’राक्षसाने प्रयत्न केले होते. मग पराशर ऋषींनी गणपतीची आराधना केली. तो गणपती म्हणजे गणेशखिंडीतील गणपती, ज्यावेळेस गणपतीला हा राक्षस  आवरला नाही, त्यावेळी त्याने आईची आराधना केली म्हणजे पार्वतीची. पार्वतीने सांगितले की तो राक्षस माझ्याच्यानेही आवरणार नाही. त्यावेळी तिने शंकराच्या जटातील "मुळगंगा"हिच्या साह्याने धुम्र राक्षसाशी युध्द केले त्यात मळगंगेला यश आले. त्या डोंगराचे नाव धुम्या डोंगर म्हणुन ओळखले जाते. तिथुन डोंगर सोडुन मळगंगा डोंगर सोडुन  चिंचेच्या बनात आली. त्यामुळे या गावाला "चिंचोली" हे नाव पड्ले आहे. त्याठिकाणी मळगंगेचे मन रमले त्या ठिकाणी तिची स्थापना झाली. त्यावेळी पासुन ही "मळ्गंगा" या नावाने व पार्वती "वडजाई" या नावाने ओळखले जाऊ लागले. या मळगंगेला कौल लावला जातो. चैत्री पोर्णिमेला देवीला हळद  लावण्याचा कार्यक्रम होतो. चैत्री वैद्य सप्तमीला देविचा उत्सव असतॊ. ज्या महिलांना बरेच वर्ष आपत्य होत नाही त्या देवीला कैल लावण्यासाठी येथे येतात आणि देवीला कौल लावुन आपली मागणी मागतात. यात्रेच्या दिवशी "हेका" म्हणुन कार्यक्रम असतो. मळगंगेच्या सात ठिकाणांपैकी हे मुळ ठिकाण आहे. पारनेरपासुन मंदीर ८ किमी अंतरावर आहे. मंदीराचे विशेष म्हणजे नवरात्रत संपुर्ण गावाचे घट मंदीरातच स्थापण होतात. "मळेवडजाई देवस्थान ट्रस्ट " येथे कार्यरत आहे.