Friday 25 April 2014

श्री देवीभोयरे देवस्थान




श्री देवीभोयरे मंदीर हे देवीभोयरे गावातील, पारनेर तालुक्यातील प्रसिध्द मंदीर आहे. मंदीराची स्थापना कै. शंकर देवराव क्षीरसागर यांनी  सन १९१२ मध्ये केली.




आख्यायिका :
क्षीरसागर कुटुंबाची माहुर गडच्या रेणुकेवर खुप श्रध्दा होती. ते माहुरगडी नवरात्रोत्तसवासाठी आवर्जुन जात असत, पण पुढे वय झाल्यावर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना माहुरगडी जाण्यास जमत नसे. त्यांना रोज पुजेच्यावेळी जाणवायचे की आपला नेम चुकला आणि त्यांना गहिवरुन आले. त्यांची भावभक्ती व तळमळ जगदंबेला जाणवली. देवीने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला. मी भेटायला आले आहे. असे त्रिवार स्वप्न  पडले व स्नप्नांत व स्वप्नात देवीने त्यांना ठावठिकाणा दाखविला.

क्षीरसागर कुटुंब हे प्रथम चोंभुत ह्या गावी रहात असत. चोंभुत हे देविभोयरे येथुन १८ किमी वर नैऋत्य दिशेस आहे. त्यांना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन जी जागा दाखविली ती म्हणजे देविभोयरे गाव होय. असे स्वप्न २/३ वेळेस पडले. सतत स्वप्नदृष्टांत झाल्यावर व जागाही दिसल्यावर क्षीरसागरांनी त्याठिकाणी जाऊन जागा खणण्यास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे तिथे पाषाणाची तांदळाकृत प्रतिमा व सभोवती हळदी-कुंकवाच्या भरलेल्या पेट्या, अशा स्वरुपातील निर्गुण जगदंबा तांदुकार मुर्ती सापडली. त्या दिवसाचा योग अंत्यंत उज्जवल असल्याचे जाणुन, तिथल्यातिथेच एक वेदिका रचुन ती मुर्ती समंत्रक स्थापण केली. देवीच्या मुर्तीसमोरील सिंह जे धर्मस्वरुप मानले जाते ती सोनपितळेची मुर्ती १६.५ किलो वजनाची आहे. भुविवरात देवी प्रकट झाली म्हणुन त्याला देवीभुविवर म्हणु लागले व त्याचे आज देवीभोयरे म्हणुन नाव पडले