Friday 25 April 2014

साई बाबा

श्री क्षेत्र शिर्डी (साईबाबा) मंदीर, शिर्डी
साईबाबा  हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे धार्मिक स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते.
बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री साईबाबा शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या श्वान कार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते कि, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.
मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोबर  इ.स. १९१९ रोजी साईबाबानी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आलेअसून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.
साईबाबा शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. साईबाबा पुढे सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण दिली.
'सबका मालीक एक' हे साईचे बोल होते. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जगाला दिला.
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेनेयेण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.